Breaking News

जामखेड ते श्री श्रेत्र तेर ढोकी पायी दिंडी सोहळा

जामखेड : सालाबादप्रमाणे जामखेड ते श्री श्रेत्र तेर ढोकी पायी दिंडी सोहळा अखिल भारतीय प्रजापती (कुंभार) महासंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल (आण्णा) राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे हे १२ वर्ष आहे. दि.६ मार्च रोजी रोजी सकाळी आठ वाजता कुंभारगल्ली येथील श्रीराम मंदिरापासून या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. राजूरी, खर्डा, पाथ्रूड, बावी, चिंचोली फाटा, हांडोरी, दिंडोरी, तेरखेडा, येडेश्वरी देवी मलकापूर, वडगाव, तूगांव मार्गावरून शुक्रवारी { दि. १२} रोजी श्री श्रेत्र तेर ढोकी येथे पोहचणार आहे. या दिंडी सोहळ्यात ह भ प रंधवे बापू, तुळशीराम मूळे, पंढरीनाथ राजगुरू महाराज, विजय बगाडे महाराज, गाडे महाराज, झेंडे महाराज, कांताबाई सोनटक्के महाराज, आर. बी. के. प्रजापती आदींसह वारकरी सहभागी झाले आहेत. दि १५ मार्च रोजी हभप वामन महाराज शिंदे, सरळगाव यांचे नृसिंह मंदिर येथे काल्याचे कीर्तन होईल.