निलक्रांती चौकात नागरिकांसाठी स्नेहभोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त निलक्रांती मित्र मंडळ व भाईजी फ्रेंड सर्कलच्या वतीने इतर खर्चांना फाटा देवून सर्व धर्मियांसाठी निलक्रांती चौकात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला. या उपक्रमासाठी सुमेध साळवे, कपिल साळवे, किरण पटेकर, रोहित शिरसाठ, अॅड.संदीप पाखरे, प्रकाश साळवे, किशोर साळवे, अशोक पारधे, विनोद साळवे, येशुदास बारस्कर, सुशिल रोकडे, अविनाश शिंदे, मनोज साळवे, करण साळवे, गौरव साळवे, शुभम गायकवाड, महेश काकडे, विरेश पाडळे, नितीन तडके, प्रशांत भोसले, कनिष्क साळवे, सुजित खरारे, महेश सोरटे, यश साळवे, नितीन थोरात आदिंनी पुढाकार घेतला.