आरोपींना फाशी देवून, हे प्रकरण दडपणार्यांवर कारवाईची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- कठुआ (श्रीनगर) येथे आठ वर्षाच्या निरागस मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ तथागत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर मुंडन करुन निषेध नोंदविण्यात आला. तर या प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी देवून, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने करुन सत्ताधार्यांविरोधात घोषणा दिल्या.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन, या घटनेतील मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन, मुंडन करुन घेतले. या आंदोलनात सचिन बाबणी, योगेश भंडारी, दानिश शेख, आसिम शेख, अल्तमाश शेख, विकी प्रभळकर, अजहर शेख, वैभव भालेराव, शाहनवाझ शेख, रेहान शेख, तुषार गायकवाड, तेजस गायकवाड, कार्तिक म्हस्के, निरज धसाळ, सनी भैलुमे, सुयश काळे, भिम वाघचौरे, सागर पाडळे, कुणाल जाधव, करण क्षीरसागर, बबन वाघचौरे, आकाश भालेराव आदि सहभागी झाले होते.