Breaking News

मोदींची स्वीडनच्या राजासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा.


स्टॉकहोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वीडनचे राजे कार्ल १६ वे गुस्ताफ यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबच विविध मुद्द्यावर चर्चा केली. स्वीडनच्या राजासोबत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लोफवेन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड व नॉर्वे देशाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी सोमवारी स्वीडनच्या राजधानीत दाखल झाले. भारताचे पंतप्रधान म्हणून तब्बल ३० वर्षांनी नरेंद्र मोदी युरोपीयन देशाचा दौरा करत आहेत.