Breaking News

महाराष्ट्र पञकार संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन


श्रीरामपुर,  महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन रविवार दि. 8 रोजी शिर्डी येथील केबीस गार्डन येथे होणार आहे या बैठकीला, महाराष्ट्र पञकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी, प्रदेश सदस्य उतम भोसले व उपाध्यक्ष रामनाथ जहाड, अशोक दुशिंग व संपर्क प्रमुख किरण शिंदे उपस्थित रहाणार आहेत. 

यावेळी पञकारांचा 1 लाखाचा अपघात विमा मोफत उतरवला जाणार आहे व संघटनेचे ओळखपञ मोफत दिले जाणार आहे. या बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पञकार बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र पञकार संघाचे नुतन जिल्हा अध्यक्ष दत्ताञय खेमनर, जिल्हा सचिव राजेन्द्र बनकर यांनी केले आहे.