Breaking News

अनैतिक संबधास अडथळा ठरणा़र्‍या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या


श्रीरामपुर तालुक्यातील पढेगांव येथेे अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना घडली आहे. यासंबंधी श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनमध्ये भाद कलम 41/2018 कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी आप्पासाहेब इंद्रभान पवार रा.पढेगांव वय 49 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल प्रविण तोरणे व मनिषा विकास पवार यांनी संगनमताने दि. 5/4/2018 रोजी राञी 1 च्या दरम्यान आरोपीच्या घराजवळ आमच्या अनैतिक संबंधाला विरोध का करतो म्हणत मयताच्या डोक्यावर, हातावर दांड्याने गंभीर मारहाण करुन जिवे मारुन टाकले अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की पढेगांव परिसरात जञा सुरू असुन या भागात राहणारा विकास इंद्रभान पवार हा नेवासा तालुक्यातील कुकाण्याला कामाला असुन तो विवाहीत असुन त्यास पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. तो याञेनिमित्ताने पढेगांव येथे आला होता. आज सकाळी पढेगाव परिसरातील बोधेगांवच्या दिशेन पडीक शेतात विकास पवार याचा मृतदेह आढळून आला त्याच्या डोक्यावर हातावर, जखमा झालेल्या होत्या. याची खबर तालुका पोलिसांना देण्यात आली पोलिस निरिक्षक पथवे हे पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले.

मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी विकास पवारचा मृतदेह श्रीरामपुरला नेण्यात आला. हा खुन असल्याचे पोलिसांनी घाटनास्थळींच ओळखले. तातडीने तपास चक्रे फिरले तेव्हा नाजुक कारणातुन विकास इंद्रभान पवार याचा खुन पढेगाव परिसरातीलच विशाल नावाच्या तरुणाने केल्याचे समोर आले. क्षणाचा ही विलंब न लावता पोलिसांनी विशाला ताब्यात घेतले. यासंबंधी पोलिस निरिक्षक वसंतराव पथवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाजुक कारणातुन हा खून झाला असून आरोपी विशाल तोरणे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक वसंतराव पथवे करत आहे.