Breaking News

खेळाडूंनी करिअर म्हणून तायक्वांदोकडे पहावे : राळेभात


तायक्वांदो हा एक दर्जेदार तसेच सर्व मान्यताप्राप्त खेळ आहे. या खेळाकडे खेळाडूंनी करिअर म्हणून पाहायला हवे असे मत जि.प.चे माजी सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले. यावेळी जीन- सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या जिल्हा संघटनेच्या वतीने जामखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिराच्या प्रांगणात गुणवंत खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात बोलत होते. जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक गणेश आजबे, भारत मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते सिद्दार्थ घायतडक, पोलीस वांरटचे संपादक बापुसाहेब गायकवाड, भारत मुक्ती मोर्चाचे नगर जिल्हाध्यक्ष नामदेव राळेभात, संभाजी ब्रिगेटचे तालुकाध्यक्ष अवधूत पवार, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समीर शेख यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण आहे. आजही काही ठिकाणी या नोकर्‍यांसाठी खेळाडू उपलब्ध नाहीत. तायक्वांदो हा मार्शल आर्टस् मधला एक उत्तम खेळ आहे. यास शालेय स्तरापासून ते ऑलिम्पिकपर्यंत सर्व मान्यता आहेत. त्यामुळे अशा खेळामध्ये खेळाडूंचे करियर घडू शकते. असे म्हणून त्यांनी जामखेडच्या या खेळाच्या गेल्या पंचवीस वर्षातील आठवणींना उजाळा दिला. भविष्यात तालुक्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नावलौकिक मिळतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
सिद्दार्थ घायतडक म्हणाले की, जामखेडचे तायक्वांदो खेळाडू मेहनती आहेत. म्हणूनच ते राज्य पातळीपर्यंत चमकले आहेत. येथे मुलींचे प्रमाण अधिक आहे. 

स्वसंरक्षणासाठी मुलींनी हा खेळ शिकला पाहिजे. यावेळी मिताली बारगजे, यशोदा बेरड, गायत्री बारगजे, तनिष्का डाडर, श्रावणी बारगजे, सानिया जाधव, करिना जाधव, साक्षी पवार, नंदिनी जाधव, प्रिया माने, अक्षता उदारे, धनश्री लिखे, जान्हवी आंदूरे, हुमा शेख, पूर्वा डमाळे, माधवी आढाव, संध्या पिंपळे, जयश्री बेरड, यशवर्धन बेरड, ओम बारगजे, आदित्य उदारे, संकेत भालेराव, आदित्य जायभाय, प्रवीण बांगर, जयदीप यादव, उदय शिंदे, आलोक नवलाखा, श्रेयांश नवलाखा, हर्ष भोरे, कृष्णा माने, गणेश डांगरे या खेळाडूंना तायक्वांदोचे विविध कलर बेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे, तालुका संघटनेचे संजय बेरड, दत्तात्रय उदारे रणजित शिंदे उपस्थित होते.