Breaking News

समशेरसिंह पारधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा


आदिवासी संघटनेच्या वतीने क्रांतिवीर समशेरसिंह पारधी यांचा स्मृतिदिन पोथरे येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळ्याचे उपकोषागार अधिकारी उत्तम वळवी होते. राशिनच्या संकल्प आदीवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रा. नितिन तळपाडे, धिंगाणा गभाले, विश्‍वनाथ धुमाळे यांनी आपल्या भाषणातुन आदिवासी इतिहास, संस्कृती आणि ज्वलंत समस्या या विषयावर विचार मांडले. कवी बबन शेळके यांनी मधुर आवाजात बिरसा ही कविता सादर केली. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

संस्थापक विजय भोसले, विजय काळे, विलास काळे, सुरेश पवार, गोरख गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन लहू गभाले यांनी केले. साहेबराव पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.