Breaking News

अळकुटी, चोंभुत गावांमध्ये कोट्यावधींच्या विकास कामांचे भूमिपूजन


पारनेर तालुक्यातील अळकुटी व चोंभुत येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नदी पुनर्जीवन योजनेअंतर्गत अळकुटी व चोंभुत येथे सिमेंट काँक्रीट बंधार्‍याचे भुमिपुजन राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील व जलसंधारण पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आमदार विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. अळकुटी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. अळकुटी येथे होत असलेला सिमेंट बंधारा अंदाजे रक्कम 55.19 ला साठवण क्षमता 111.53 स.घ.मी. चोंभुत येथे होत असलेला सिमेंट बंधारा अंदाजे रक्कम 58.44 लक्ष साठवण क्षमता 112.03 स.घ.मी. असुन याचा मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

 
या भागामध्ये नदीजोड पुनर्जिवन अंतर्गत जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले यांच्या मागणीनुसार आ. विजय औटी यांनी अनेक सिमेंट बंधारे, रस्ता रुंदीकरण मजबुतीकरण तसेच मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. याभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा, रस्ता दुरुस्ती झाल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले, जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले, भाजप तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, महिला आघाडी प्रमुख उमा बोरुडे, मार्केट कमिटी सदस्य वसंत चेडे, जि. प. सदस्य काशिनाथ दाते, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब तांबे, मा. सभापती गणेश शेळके, सुभाष दुधाडे, आश्‍विनी थोरात, कृष्णकांत बडवे, डॉ. अजित लंके, ताराबाई चौधरी, सरुबाई वाघ, डॉ. श्रीकांत पठारे, शिवाजी बेलकर, अशोक कटारिया, युवराज पाटील, सावकार बुचुडे, अ‍ॅड. राहूल झावरे, विश्‍वास रोहकले, भिमा औटी, रामदास नरड, एस.डी. शिंदे, नंदेश कर्डीले, तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, संचालक, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अळकुटी /चोंभुत ग्रामस्थांनी केले आहे.