Breaking News

सुरेश सोळसे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चौकशीचे आदेश


अकोला महानगरपालिकेत मुख्य लेखा परीक्षक या पदावर कार्यरत असलेले सुरेश रतन सोळसे यांचा वित्त विभागातील वरिष्ठांनी छळ केला, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दैनिक लोकमंथनने प्रकाशित झाल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश अप्पर मुख्य सचिवांना दिले. यासाठी एस.सी., एस.टी. रिझर्व्हेशन अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची शिष्टमंडळासह भेट घेत संपूर्ण वृत्तांत सांगितला. तसेच दैनिक लोकमंथनने प्रकाशित केलेली बातमी देखील मुनगुंटीवार यांना वाचून दाखविली. अखेर याची नोंद घेत मुनगंटीवार यांनी चौकशी समिती नियुक्त केली. अकोला महानगरपालिकेत मुख्य लेखा परीक्षक या पदावर कार्यरत असलेले सुरेश रतन सोळसे यांना काही जातीयवादी वित्त ि वभागातील अधिकार्‍यांनी त्यांचा छळ केला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. सुरेश सोळसे यांचे संपूर्ण कुटुंब नाशिक येथे राहत असून, त्यांच्या मुलाचा अपघात झाला, त्यात त्याच्या मेंदुला जबर मार लागला. परिणामी सोळसे यांना अकोला ते अमरावती असे सारखे यावे लागत होते. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करून, आपली बदली नाशिक येथे करावी अशी विंनंती केली. मात्र सोळसे यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांची बदली अमरावती येथे करत, त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न वित्त विभागातील अधिकार्‍यांनी केल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात दैनिक लोकमंथन वृत्त प्रकाशित केले, तर व एस.सी., एस.टी. रिझर्व्हेशन अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत, यासंपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली होती.