Breaking News

चितपट कुस्तीने भोयरे गांगर्डा भैरवनाथ यात्रेची सांगता

पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ यात्रा उत्सवात हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दुसर्‍या दिवशी सायंकाळी 4 वाजता हगाम्यास प्रारंभ झाला. हगाम्यात चितपट कुस्तीने मोठ्या उत्साही वातावरणात यात्रेची सांगता झाली.


या दरम्यान पुणे, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा आदी ठिकाणाहून मल्लांसह महिला मल्लांनी हजेरी लावली. यावेळी कुस्त्यांचा थरार पाहून ग्रामस्थांनी बक्षीसांचा वर्षाव केला. हगाम्याची सांगता झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ मंदीरासमोर येवून यात्रेदरम्यान जमा वर्गणी, झालेला खर्च आदींचा हिशोब देण्यात आला. यावेळी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलत गांगड, मा. सरपंच भाऊसाहेब चांगदेव भोगाडे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक पवार, उद्योजक अरूण काटे, शिवाजी सातपुते, सुपा पोलिस स्टेशनचे हे. कॉ. शेरकर, साठे आदी उपस्थित होते. पंच म्हणून सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, नाना रसाळ, ग्रा.पं. सदस्य अर्जुन डोंगरे, संजय पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिक पवार, भाऊसाहेब रसाळ आदींनी काम पाहीले. यात्रेनिमित्त भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने भरवण्यात आलेल्या हाप पिच टेनिस बॉल स्पर्धेचे प्रथम पारितोषिक शिरूर येथिल शिवतेज क्रिकेट क्लब, द्वितीय पारितोषिक भोयरे गांगर्डा येथिल भैरवनाथ क्रिकेट क्लब, तृतिय पारितोषिक विसापूर क्रिकेट क्लब, चतुर्थ बक्षीस सारोळा सोमवंशी क्रिकेट क्लबने पटकाविल्याबद्दल त्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.
यात्रेपुर्वी गावातील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब जवक यांच्याकडून मारूती मंदीर, महादेव मंदीरासाठी स्वखर्चाने सागवाणी दरवाजे बसविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.