Breaking News

भेंडा येथे डॉ. नरेंद्र घुले चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

भेंडा (प्रतिनिधी)- येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने भेंडा येथे आयोजित माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील चषक राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला र विवार दि.15 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाचे क्रीडांगणावर जेष्ठ पत्रकार व जलनायक सुखदेव फुलारी यांचे हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन झाले.मुंबई विरुद्ध रायझिंग रायडर्स पाथर्डी या संघाचा पहिला सामना सुरू करण्यात आला. यावेळी पत्रकार कारभारी गरड, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, गणेश गव्हाणे,सोपान महापूर, पत्रकार रमेश पाडळे, राहुल कोळसे, घुले क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष किशोर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, संजय मिसाळ, दादासाहेब गजरे,सुरेश सानप,अशोक साळवे,क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक शरद दरंदले, रविंद्र डोले, समीर पठाण, नोहिद पटेल, सारंग बोरुडे आदी उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी राज्यभरातील 32 संघांनी सहभाग नोंदविलेला