Breaking News

पगार शासनाचा, कार्यालय साबांचे, निष्ठा मात्र राजकारण्यांच्या पायाशी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाणांचा कारभार चौकशीच्या रडारवर

औरंगाबाद/विशेष प्रतिनिधी : औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम मंडळाला राजकीय अड्डा बनवून अधीक्षक अभियंता अतूल चव्हाण यांनी भ्रष्टाचाराची माया जमविल्याचे खुले आरोप होत आहेत. शासकीय पगार घेऊन राजकीय पक्षाच्या पायावर निष्ठेच्या अक्षता वाहणार्‍या अधीक्षक अभियंत्यांना निलंबित करावे, निलंबन काळात चौकशी पुर्ण करून अपसंपत्तीचे गुन्हे दाखल करावेत अशी नवी मागणी पुढे आली आहे.


यापुर्वी अतुल चव्हाण यांनी मुंबईसह अनेक ठिकाणी काम करतांना राजकीय पुढार्‍यांशी संगनमत करून सार्वजनिक बांधकामाचा निधी कंत्राटदार, राजकीय पुढारी आणि आपल्या लॉबीतील अभियंत्यांच्या खिशात घातला. औरंगाबादमध्ये आल्यानंतर तर साबां मंडळाचे कार्यालय राजकारणाचे संपर्क कार्यालय बनले. पक्षीय राजकारणातील खलबते, कंत्राटदारांची सेटलमेंट आणि निवडणूकीची खलबते या कार्यालयात होऊ लागली. पुण्यातही अतुल चव्हाण यांच्यासंदर्भात एक भानगड चांगलीच गाजली होती. या एकूण पार्श्‍वभूमीवर अतुल चव्हाण यांच्या कामकाजासह मालमत्तेची चौकशी क्रमप्राप्त असाल्याची मागणी होत आहे.
उद्याच्या अंकातः
-अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या कारकिर्दीत साबां बनला राजकीय अड्डा
-शंभर कोटींच्या भ्रष्टाचारात केवळ तीन अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करणारे अतुल चव्हाण या प्रकरणात सहभागी असलेले राजकीय पुढारी आणि कंत्राटदारावर मेहेरबान का झाले?
-अतुल चव्हाण यांचे कुणाशी संगनमत आहे?