Breaking News

पाकिस्तानला धडकी

अमेरिकेशी दुरावा झाल्यानंतर पाकिस्तानने चीनला आपल्या जवळ खेचलं होतं. पाकिस्तान-चीन आ र्थिक कॉरिडॉर आणि काही बंदरही पाकिस्तानने चीनला विकासासाठी दिले होते. मात्र पाकिस्तानच्या मैत्रीला मर्यादा आहेत हे चीनला माहित आहे. त्यामुळं चीनने भारताशी मैत्रीचा हात पुढे केल्यावर पाकि स्तानचा जळफळाट झाला आहे. शेवटी चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने खुलासा करत चीन-पाकिस्तान मैत्री कायम असून भारता-चीनची मैत्री आणि पाकिस्तानसोबतचे संबंध हे स्वतंत्र आहेत असं स्पष्ट करत पाकिस्तानची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला.