Breaking News

भारत-चीन नव्या पर्वाला सुरूवात ! भारत-चीन अफगाणिस्तानात राबविणार संयुक्त प्रकल्प

वुहान/वृत्तसंस्था : ऐतिहासिक भारत-चीन शिखर परिषदेची शनिवारी सांगता झाली असून, दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्याची तयारी दाखवली आहे. या बैठकीत भारत, चीन आणि अफगाणिस्तान मिळून एक अर्थविषयक प्रकल्प संयुक्तरित्या राबविणार आहेत. हा एक प्रकारे पाकिस्तानाला चीनने दिलेला धक्का असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात मानले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी हा प्रकल्प अफगाणिस्तानात राबविण्यास संमती दिली आहे. तसेच भविष्यात कोणत्याही तिसर्‍या राष्ट्राला कसल्याही प्रकरची मदतीची गरज असल्यास भारत आणि चीन त्यांना सहकार्य करणार असल्याचे माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. या शिखर परिषदेला कुठलाही ठराविक अजेंडा नव्हता. त्याचबरोबर घोषणापत्र किंवा संयुक्त पत्रकार परिषदही घेण्याचही ठरलेलं नव्हतं त्यामुळं कुठलही घोषणापत्र किंवा प्रसिध्दी पत्रकही काढण्यात आलं नाही. फक्त महत्वाच्या मुद्यांची माहिती गोखले यांनी दिली. त्यातून अनेक महत्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या असून भारत आणि चीनमध्ये सहक ार्याच्या नव्या पर्वाची ही सुरवात मानली जात आहे.शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपींग यांच्यात चर्चेच्या तीन फेर्‍या झाल्या. दिवसाची सुरवातच दोन्ही नेत्यांनी ईस्ट लेकच्या निसर्गरम्य परिसरात फेरफटका मारून केली. नंतर पारंपरिक चहाचा अस्वाद घेऊन चर्चा केली. त्यानंतर एका खास बोटीत बसून दोन्ही नेत्यांनी ईस्ट लेकमध्ये विहार करत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. आत्तापर्यंत अफगाणिस्तानच्या पुर्नउभारणीत भारत नेहमीच अमेरिकेच्या मदतीनं काम करत होता. आता संतुलन साधन भारत आणि चीनही सहकार्यानं अनेक प्रकल्प हाती घेणार आहे. हा निर्णय म्हणजे पाकि स्तानला धक्का मानला जातो. कारण अफगाणिस्तानात चीन नेहमीच पाकिस्तानचं सहकार्य घेत आला आहे.