वाळूतस्करीप्रकरणी साडेआठ लाखांचा दंड
कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील कोळगाव थडीच्या गोदापात्रात धाड टाकून कोपरगाव तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने ६ ट्रॅक्टर, १ बुलेट आणि ३ दुचाकी वाहने ताब्यात घेत साडेआठ लाखांचा दंड ठोठावला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, स्थानिक महसूल विभागाने ही वाहने आपल्याच ताब्यात ठेवण्याचा नवा फंडा वापरून न्यायालयातून झटपट सुटण्याचा मार्ग बंद केला. यामुळे वाळू तस्करांची मोठी कोंडी झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील गोदावरी नदीपात्रातून तसेच जवळच्या वनविभागाच्या जमिनीतून अवैध वाळू तस्करी सुरु असल्याची माहिती तहसिलदार किशोर कदम यांना समजली. महसूल विभागाच्या १८ कर्मचा-यांच्या पथकाने बुधवारी {दि. ११} रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पथकासह नदीपात्र व परिसरात धाड टाकून तब्बल ६ ट्रॅक्टर,१ बुलेट व ३ मोटारसायकली ताब्यात घेतल्या. अंधाराचा फायदा घेवून वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत महसूल पथकाचे प्रमुख तहसिलदार किशोर कदम, २ मंडल अधिकारी, ६ तलाठी, ८ कार्यालयीन कर्मचारी आदींचा पथकामध्ये समावेश होता. वाळु तस्करांना आर्थिक दंड मोठया प्रमाणात जोपर्यंत बसत नाही, तोपर्यंत बेकायदा वाळू उपसा बंद होणार नाही. बेकायदा वाळू तस्करी करणा-यांवर यापुढे अशा दंडात्मक कारवाई अधिक प्रमाणात केल्या जाणार असल्याचे तहसिलदार कदम यांनी सांगितले.