Breaking News

जोधपूरला छावणीचे स्वरूप

जोधपूर पोलिसांनी आसारामला 2 ऑगस्ट 2013 ला अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगामध्ये आहे. निकालानंतर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राजस्थान, गुजरात आणि हरियाणामध्ये सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. निकालाच्या दिवशी जोधपूरमध्ये आसाराम समर्थक मोठ्या प्रमाणावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे प्रतिबंधात्मक आदेशाचे कलम लागू करण्यात आले आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली. आसारामला अद्याप गुजरातमधील सुरत येथील दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीचाही सामना करावयाचा आहे. यात त्याचा मुलगा नारायनसाई हादेखील आरोपी आहे.