Breaking News

अग्रलेख - तथाकथित धर्मांच्या ठेकेदारांना चपराक

देशभरात धर्मांचे अवडबंर माजवण्यात येत असून, आम्हीच खरे धर्मांचे ठेकेदार असा आभास या धर्मांच्या ठेकेदारांनी निर्माण केला होता. आपले साम्राज्य वाढवत, सर्वसामान्य माणसांला आपल्या गळाशी लावत, खोटया भक्तींचे साम्राज्य उभे केले होते. मात्र या भक्तींच्या साम्राज्यात या तथाकथित साधू संताचे काळेधंदे सुरू होते. काळेधंदे दाबण्यासाठी यांनी साम, दंड, भेद, अर्थ या सगळयांचा वापर करून अनेक वर्ष आपले गोरखधंदे सुरू ठेवले. मात्र पापांचा घडा भरल्यानंतर ही पापे लपून राहत नाही, त्याचप्रकारे यांचे बिंग फु टले. बिंग फुटले, गुन्हा दाखल झाला, अटक देखील झाली. मात्र तरीही कोर्टात पुरावे समोर येऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. अनेकांचा जीव घेण्यात आला. मात्र आज अशाच एका तथाकथित साधू असलेल्या आसारामला जोधपूर न्यायालयाने बलात्कारप्रकरणांत दोषी ठरवले. आसारामला दोषी ठरवल्यानंतर त्याला शिक्षा देखील होणारच. मात्र प्रश्‍न निर्माण होतो, कर देशभरांत असे भगवे वस्त्र घालून समाजाची दिशाभूल करणांरे, नैतिकतेच्या बाजारात स्त्रियांच्या अबु्रशी खेळणारे तथाकथित साधू संत किती असेल, त्यांची मोजदाद नाही. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी, नंतर निर्दोष मुक्तता झालेली साध्वी प्रज्ञा यांनी आसाराम बापूला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ईश्‍वराने आसाराम बापूंना दोषमुक्त करावे, अशी प्रार्थनाही साध्वी प्रज्ञा यांनी केली. आसाराम दोषी, की निर्दोष यांच्यावर वक्तव्य करून, कायद्याची खिल्लीच एकप्रकारे साध्वी यांनी उडविल्याचे दिसून येत आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे, अशा तथाकथित साधू, बाबा, बुवा महाराज, माँ, यांच्यामागे तथाकथित धर्मांचे ठेकेदार उभे राहतात. परिणामी, या बाबांचे प्रस्थ वाढत जाते. समाजात आज विविध ठिकांणी बाबा, महाराज, बुवा, तथाकथित संत, बापू, माँच्या सत्संगाच प्रस्थ मोठ होतांना, वाढतांना दिसून येत आहे. या बुवां, महारांजाची लाईफस्टाईल एखाद्या राजाला देखील लाजवेल असा, शाही थाट, त्यातून लाखोचे भक्त, त्यातून राजकारणांशी यांची बांधीलकी. अर्थात असे बुवा, बाबांचे प्रस्थ एका दिवसांत वाढत नाही. तर त्याला अनेक बाबी कारणीभूत आहे. भारतीय समाजाला विवेकवादाचे वावडे आहे. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा भार हा समाज स्वता:च्या खांद्यावर उचलायला तयार होत नाही. तर तो आपला भार एकतर देवाच्या अथवा कोणत्याच बुवा, बाबाच्या हवाली करून, निश्‍चितपणे जगु पाहतो. यातून बाबा लोकांची महती वाढते, आणि याच बाबा लोकांचे राजकारण्यासोबत असलेले संबध, सिनेसृष्टी सह अनेक नावाजलेल्या व्यक्तीसोबत यांचे असलेले संबध आणि स्तोम यावरून, त्यांना लाखोंचा भक्त वर्ग मिळतो. त्यातूनच असे आसाराम, साध्वी, स्वयंघोषीत संत रामपाल, डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम सिंग जन्माला येतात. असे संत बुवा, महारांजाचे अड्डे देशभरात आहेत. मात्र या प्रस्थाविरूद्ध पावले उचलण्यासाठी सरकार, प्रशासन पावले उचलत नाही. कारण सरकार प्रशासनच अशा बुवा, महाराजांच्या समोर पायघडया घालतात. या बुवा, बाबांच भांड फुटल्यानंतर, त्यांचा असली चेहरा समाजासमोर आल्यानंतर, खरं तर अशा बुवा, बांबाना चपलेचा मार पडावा, यासाठी समाजाने रस्त्यावर उतरणे अपेक्षित असतांना, या बाबांना दोष देण्याऐवजी अनेक त्यांचे समर्थक रस्त्यावर येऊन त्यांचे समर्थत करतात, हाच मुळी अविवेकी विचार आहे. अशा तथाकथित बुवा, बाबांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीला आव्हान देणे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. अशा तथाकथित बुवा, बांबाना आणि त्यांच्या समर्थकांच्या झुुंडशाहीला आता वेसन घालावेच लागणार आहे.
भगवी कफनी, परिधान केली, कपाळावर भस्म फासले, की भक्तांचे हात आपसुकच जोडले जातात. अर्थात ज्या बुवा, बाबांचे भक्त परिवार मोठा. त्या भक्त परिवारांकडे राजकारणी आपला मतदार म्हणून लक्ष केंद्रीत करतात, त्यासाठी बाबांच्या मठात, राजकीय व्यक्ती पायघडया घालतात, त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. शासकीय भुखंड या बाबा लोकांना खुप कमी किमंतीत पदरात पाडून देतात. त्यामुळेच या बाबांना राजकीय पाठिंबा आपल्या पाठीशी असल्याची जाणीव होते, त्यामुळे मग बाबा, बुवा वाटेल ते धंदे करतात. बाबा राम रहीम गजाआड झाला असला, उद्या त्याला शिक्षा सुनावणार असले तरी मुख्य मुद्दा आहे, बुवा- बांबाचे साम्राज्य को खालसा करायचे? बुवा-बांबाच्या पाठीमागे असलेले राजकीय वरदहस्त प्रमाणिकपणे काम करणार्या अधिकार्यांसमोर अडचणी वाढवून ठेवतात, त्यामुळे असे बाबा-बुवांना गजाआड पाठविण्यासाठी मोठा अवधी लागण्याची शक्यता आहे. आसाराम ने देखील आपले साम्राज्य मोठया प्रमाणात वाढवले होते. अनेक राजकारणी आसारामच्या आश्रमात जात होते. आसारामचे नव्वदच्या दशकात मोठे प्रस्थ होते. साधारण 1996-97 मध्ये आसारामचे भुसावळला सात- आठ दिवस प्रवचन होते. त्यात संघ परिवारातील संघटना, शिक्षण संस्थांनी आसारामच्या चरणी लोळायचेच बाकी ठेवले होते. शाळा अर्धा दिवस सुरू असत. स्वस्तात मिळतात म्हणून आसारामच्या वह्या, उदबत्ती-धूप, कॅसेट्स, माळा, लॉकेट्स आदींची मोठया प्रमाणावर विक्री झाली होती. आता हेच आसाराम तुरूंगात आपल्या पापाचे, कर्माचे फळे भोगत आहेत, आणि त्यांच्या गुन्ह्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब देखील केले आहे. त्यामुळे समाजाने आता धर्माचे अवडबंर माजवणार्‍या तथाकथित साधु संतापासून सावध होण्याची वेळ आलेली आहे.