Breaking News

‘आत्मा मालिक’ ग्रंथालयाला पुस्तके भेट

कोपरगांव ता. प्रतिनिधी - येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलाच्या ओम गुरूदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकूलाला प्रदीप लोखंडे यांच्या ‘ग्यान की लायब्ररी’ मार्फत पुस्तक भेट देण्यात आली. एकूण १८७ पुस्तकांचा संच सुनिता आंबरे {अहमदाबाद, गुजरात} यांच्या देणगीतून प्रदान करण्यात आला. लोखंडे यांच्या लायब्ररीअंतर्गत देशभरात ४ हजार शाळांमध्ये पुस्तके प्रदान करण्यात आली आहेत. त्याचा लाभ १० लाख विद्यार्थ्यांना झाला आहे. यावेळी प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, ग्रंथालय समन्वयक रिना मत्सागर आदी उपस्थित होते.