Breaking News

आयोगाच्या निधीतून पारदर्शक विकासकामे व्हावी : आ. थोरात

संगमनेर प्रतिनिधी - पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत ही सर्वात महत्वाची बाब आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे जात आहेत. त्यामुळे सर्व कामे पारदर्शकपणे व गुणवत्तेचेचीच झाली पाहिजे, अशा सूचना माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

पंचायत समितीच्या सभागृह १४ व्या वित्त आयोग व योजना माहिती आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती निशा कोकणे उपस्थित होत्या. यावेळी जि. प. कृषी सभापती अजय फटांगरे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, उपसभापती नवनाथ आरगडे, जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे, मिरा शेटे, शांता खैरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, काशिनाथ गोंदे, प्रियंका गडगे, बेबी थोरात, मिरा इल्हे, दत्तू कोकणे, बाबाजी कांदळकर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात सामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासाठी काम सुरु आहे. वाडीवस्तीवर विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. १४ व्या वित्त आयोगानुसार पंचायतराजमधील जि. प. व पंचायत समितीचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे जातो. याचा जास्तीतजास्त उपयोग करा. गुणवत्तापूर्वक व पारदर्शक कामे करा. विविध योजना राबवा. दलित वस्ती सुधार योजना, रस्ते, गटार बंदीस्त अशा विविध योजना आहेत. समृध्द गाव बनविण्यासाठी ग्रामसेवक महत्वाचा दुवा आहे. पदाधिकार्‍यांना सोबतीला घेऊन त्यांनी कामे करावीत. कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करा. 

जि. प. सभापती अजय फटांगरे म्हणाले, जि. प.च्या माध्यमातून अनेक योजना आहेत. त्यासाठी आपण पाठपुरावा करु. घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांना मोठी संधी आहे. ती माहिती नागरिकांना द्या.