नगर- श्री.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन व मॅक्सीमस स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने नगर मध्ये प्रथमच सर्वासाठी खुल्या बॅडमिंटन गुरुकुल अहमदनगर शहर व जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.वाडियापार्क बॅडमिंटन हॉल येथे येत्या २१ व २२ एप्रिलला शहर पातळीवर व ४ ते ६ मे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धा १०/१३/१५/१७ व १९ वयोगट एकेरी व खुलागट – स्त्री व पुरुष दुहेरी या प्रकारात होतील.
२०व २१ एप्रिल रोजी होणार्या शहर पातळीवरील या सराव स्पर्धा असतील यात शहरातील सर्व खेळाडू सहभागी होऊ शकतात.यासाठी २० एप्रिल सायंकाळी ५ पर्यंत नावनोंदणी करता येईल. बॅडमिंटन खेळाडू व्हाँटसअॅपच्या माध्यमातूनही नावनोंदणी करू शकतात. जिल्हास्तरीय भव्य बॅडमिंटन स्पर्धा ४ मे ला होतील. अधिक माहितीसाठी जितेंद्र-8149373707 ,सुरेखा- 9766493293,पल्लवी – 8796858947 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बॅडमिंटन गुरुकुल ,अहमदनगर शहर व जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:59
Rating: 5