Breaking News

दखल - तोगडियांचं राज्य खालसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण तोगडिया हे एकेकाळचे परस्परांचे सहकारी. मोदी व तोगडिया यांनी हिंदुत्त्ववादी संघटनांच्या बळकटीक रणासाठी एकेकाळी चांगलं काम केलं. दोघं एकाच स्कुटरवरून फिरत होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मैत्रीत दुरावा निर्माण झाला. मोदी यांच्या सरकारमध्ये तोगडिया हस्तक्षेप करायला लागले. ते मोदींना चालणारं नव्हतं. गृहखात्यात तोगडिया यांचा वाढलेला हस्तक्षेप मोदी यांनी अमान्य केला. खरं तर मोदी यांच्या भूमिकेत काहीच वावगं नव्हतं. बिगर सरकारी व्यक्ती सरकारी कारभारात हस्तक्षेप करायला लागला, तर ते कुणीच सहन करणार नाही. मोदी यांनी तेच केलं. तेव्हापासून मोदी व तोगडिया यांच्यातील कटुता वाढत गेली. मोदी यांच्याविरोधात तोगडिया यांनी रान उठवायला सुरुवात केली. तोगडिया हे आक्रमक हिंदुत्त्ववादी. मोदी हे ही तसेच; परंतु मोदी यांना सरकार चालवायचं होतं. त्यांनी आपला मार्ग चोखाळला. संघ परिवार मोदी यांच्यामागं ठामपणे उभा राहिला असताना तोगडिया यांनी मात्र मोदीविरोधाची भूमिका कायम ठेवली. संघाला ते चालणारं नव्हतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण तोगडिया हे एकेकाळचे परस्परांचे सहकारी. मोदी व तोगडिया यांनी हिंदुत्त्ववादी संघटनांच्या बळकटीक रणासाठी एकेकाळी चांगलं काम केलं. दोघं एकाच स्कुटरवरून फिरत होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मैत्रीत दुरावा निर्माण झाला. मोदी यांच्या सरकारमध्ये तोगडिया हस्तक्षेप करायला लागले. ते मोदींना चालणारं नव्हतं. गृहखात्यात तोगडिया यांचा वाढलेला हस्तक्षेप मोदी यांनी अमान्य केला. खरं तर मोदी यांच्या भूमिकेत काहीच वावगं नव्हतं. बिगर सरकारी व्यक्ती सरकारी कारभारात हस्तक्षेप करायला लागला, तर ते कुणीच सहन करणार नाही. मोदी यांनी तेच केलं. तेव्हापासून मोदी व तोगडिया यांच्यातील कटुता वाढत गेली. मोदी यांच्याविरोधात तोगडिया यांनी रान उठवायला सुरुवात केली. तोगडिया हे आक्रमक हिंदुत्त्ववादी. मोदी हे ही तसेच; परंतु मोदी यांना सरकार चालवायचं होतं. त्यांनी आपला मार्ग चोखाळला. संघ परिवार मोदी यांच्यामागं ठामपणे उभा राहिला असताना तोगडिया यांनी मात्र मोदीविरोधाची भूमिका कायम ठेवली. संघाला ते चालणारं नव्हतं. गुजरातच्या यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी सत्ता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि तोगडिया यांनी मात्र त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची असं बराच काळ चाललं होतं. संघ त्यांच्यावर नाराज होताच. 
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी विकासाचं राजकारण सुरू केलं. तेव्हा काही काळ शांत राहिलेल्या तोगडिया यांनी नंतर मात्र राम मंदिराचा प्रश्‍न उकरून काढायला सुरुवात केली. देशभर सरकारविरोधात बोलण्याचं त्यांचं सत्र सुरू होतं. काश्मीर प्रश्‍न, राम मंदिराचा मुद्दा ते मांडत होते. दुसरीकडं मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका सुरू होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी तर त्यांनी मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरच आरोप करायला सुरुवात केली. गृहमंत्रालयाचा वापर करून मला संपविण्याचा 
कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या अपहरणनाट्याच्या आरोपानं तर देशभर खळबळ उडवून दिली होती. गुजरात व राजस्थान सरकारवर त्यांनी आरोपाची राळ उडवून दिली होती. त्यांच्या या मोदी विरोधी पवित्र्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तोगडिया यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली होती. मध्य प्रदेशात त्याबाबत एक गोपनीय बैठकही झाली होती. तोगडिया यांना पद सोडण्याचा सूचक इशारा देण्यात आला; परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं तोगडिया यांना पदावरून काढून टाकण्याची व्यूहनीती संघ परिवारानं आखली. मोदी यांनी तोगडिया यांच्याविरोधात एकही शब्द न उच्चारता त्यांना जे पाहिजे, ते घडवून आणलं, हा ताज्या घडामोडीचा अर्थ. 
विश्‍व हिंदू परिषद (विहिंप) चे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगड़िया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. शनिवारी विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोगडिया गटाच्या राघव रेड्डी यांना विष्णु सदाशिव कोकजे यांनी पराभवाची धूळ चारली. कोकजे विहिंपचे नवे कार्यकारी अध्यक्ष झाल्यानं तोगडिया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. मी विहिंपमध्ये होतो आता नाही अशी घोषणा त्यांनी केली. याचा अर्थ तोगडिया आता मोदी यांच्याविरोधात मैदान गाजवायला मोकळे झाले, असं म्हणता येईल. विहिंपच्या 52 वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक झाली. तोगडिया यांनी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. सोबतच ते राम मंदिर, काश्मिरी हिंदू, रोजगार आणि शेतक -यांचे मुद्दे यावरून मोदी सरकारला दुषणे देत होते. त्यामुळं मोदी सरकारसह संघ परिवार तोगडियांच्या भूमिकेवर नाराज होता. संघ परिवारानं तोगडियांची उचलबांगडी करण्याचं नि श्‍चित केलं होतं. तोगडिया विरोध करत होते. अखेर आज विहिंपच्या 52 वर्षाच्या इतिहासात कार्यकारी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात तोगडिया गटाचे राघव रेड्डी यांचा क ोकजे यांनी पराभव केला. संपूर्ण संघ परिवार व मोदी विरोधात गेल्यानं तोगडियांचं राज्य खालसा झाल्याचं मानलं जात आहे. तसेच तोगडियांना मोदीविरोध नडल्याचं स्पष्ट झालं आहे.
तोगडिया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. त्यामुळं तोगडिया आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागणं स्वाभावीक आहे. गुजरात निवडणुकीत तोगडिया यांनी काँग्रेसच्या बाजूनं
आपली ताकद लावली होती. त्यामुळं आगामी काळात ते मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मोदी सरकारनं जर राम मंदिराचा प्रश्‍न सोडविला नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात उतरू. जो जनतेच्या व हिंदूच्या मनातील काम पूर्ण करेल त्याच्यासाठी आम्ही काम करू, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. भाजपनं बहुमत मिळविल्यानंतर अयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी कायदा बनविण्याच्या आपल्या 1989 च्या पालमपूर प्रस्तावावर पलटी मारली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. विहिंपची निवडणूक हरल्यानं व आता विहिंपला रामराम ठोकल्यानं तोगडिया मोदी विरोधातील सूर आणखी बळकट करू शकतात.