Breaking News

तरवडी-नांदूरशिकारी रस्ता कामासाठी निकृष्ट दर्जाचे खडी मुरूम वापरण्याची परवानगी?

नेवासा तालुक्यातील गेवराई ते नादुरशिकारी या रोडचे होत असलेले अतिशय खराब खडी व मुळा चारीतला विनापरवाना दहा फुटाचा खड्डा खणून वापरलेला मुरूम बाबतीत दै. लोकमंथनने प्रकाशीत केलेल्या बातम्यांच्या आधारे संबंधीत ठेकेदाराला काम थांबवीण्यास सांगितले होते.

दि.24 मार्च 2018 रोजीच्या अंकातील दै. लोकमंथन ईफेक्टमुळे सदरच्या साईडची पाहनी करून जिल्हा परीषदेकडे अहवाल देण्याचे सांगितले. त्यानुसार उपविभागीय अभियंता शेख व नेवासाचे शिवाजी घुले यांनी तरवडीच्या ग्रामस्थांसह पाहनी केली. गावकर्‍यांची मुळ तक्रारीकडे पाहण्याचे सोडून ठेकेदाराची पाठीराखन केल्याचे पाहून गावकर्‍यांनी या कामासाठी मोठा विरोध केला असता, शेख यांनी सदरच्या दगडांची व मुरमाची पडताळणी करून मगच काम चालू करण्यास सांगितले. परंतू संबंधीत ठेकेदाराने त्या अगोदरच गावकर्‍यांना दमदाटीची भाषा वापरली. माझे कुनीच काही करत नाही. मी आहे असेच मटेरियलमध्ये काम करणार, अशी भूमिका घेतल्याने संबंधीत ठेकेदार व उपविभागीय आभियंता शेख एस.जी. याचेमध्ये पैशांची मोठी देवाण घेवाण झाल्याची गावकर्‍यांना शंका आहे. अशा निष्क्रीय अधिकार्‍यांना तातडीने नलंबीत करावे अशी मागणी जि. प. अध्यक्षांकडे करणार असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.
जनशक्ती प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, विनोदसींग परदेशी जिल्हा कार्याध्यक्षांनी भेटी देऊन पाहणी केली. संमधीत ठेकेदारास चागली समज दिली होती, तरीही कोणताच परिणाम दिसून आला नाही.अशा ठेकेदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी तरवडीचे सरपंच नितीन पुंड यांचेसह गावकर्‍यांनी केली आहे.