Breaking News

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार जगतापांसह चौघांना अटक

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आमदारांसह एकूण ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले असून भानुदास कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.