Breaking News

जबरी चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद,आरोपींत एक पोलीस कर्मचारी


राहुरी विशेष प्रतिनिधी - व्यापारयाच्या डोक्याला पिस्तुल लावुन जबरी चोरु करणारया तीन आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी तालुक्यातून जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या तीन पैकी एक आरोपी अहमदनगर शिघ्रकृती दलातील पोलिस कर्मचारी आहे. 

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात {दि. ४} पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरी पारधी गावात ही घटना घडली होती. यवत पोलिस ठाणेच्या हद्दीत बोरी पारधी गाव परिसरात पुणे ते सोलापूर रस्त्या लगत व्यापारी घनश्याम भापकर हे बसले होते. तीन अनोळखी इसमांनी भापकर यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्याच्या जवळील ५० हजाराची रोख रक्कम व दोन मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला. या घटनेवरुन घनशाम भापकर यांनी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे गुन्हे शाखेचे पोलिस पथक घटना घडल्यापासून या गुन्ह्यातील आरोपी फरार होते. पुणे पोलिसांनी छडा लावत अल्ताफ चांदसाहाब पठाण, अमिर बाबा शेख {दोघे रा. मुळानगर ता. राहुरी} तर अदित्य सुभाष बेल्हेकर {रा. डिग्रस ता. राहुरी} या तिघांना पुणे गुन्हे शाखेने गजाआड करत बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्हेतील मोबाईल विकत घेणारा महेश अंकुश खोरे {वय २६, रा. गार ता. श्रीगोंदा} तसेच गुन्ह्याच्या कटात सहभागी असणारे आणि गुन्हा करण्यास मदत करणारे आरोपी नामे महावीर अडागळे {रा. रवळगाव, ता. कर्जत}, विकास अडागळे {रा. वडगाव रासाई ता. शिरूर, पुणे} या आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या टीमने गुन्ह्यात चोरीला गेलेला मोबाईल शोधून तो मोबाईल महेश अंकुश खोरे {वय २६ रा. गार ता. श्रीगोंदा} याच्याकडे मिळाल्यानंतर त्याची कसून चौकशी केली आणि घटनास्थळाचा मोबाईल काॅलवरुन या गुन्हेचे उकल झाली. गुन्ह्याच्या कटात सहभागी असणारे आणि गुन्हा करण्यास मदत करणारे महावीर अडागळे {रा. रवळगाव, ता. कर्जत}, विकास अडागळे {रा. वडगाव रासाई ता. शिरूर} या आरोपींना निष्पन्न केले आहे. महेश अंकुश खोरे {वय २६ रा. गार ता. श्रीगोंदा जि. नगर } (चोरीचा मोबाईल घेणारा) आदित्य सुभाष बेल्हेकर {रा. डिग्रस ता. राहुरी जि. नगर} हा अहमदनगर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडेच पिस्तुल असल्याचे तपासात उघड झाले आहे. आदित्य बेल्हेकर याच्याकडे पिस्तुल आला कसा, हा पिस्तुल सरकारी की बनावट, याचा शोध पोलिस घेत आहेत. 

एक पोलिस कर्मचारी जबरी लुटीच्या गुन्ह्यात सापडल्याने पोलिस खात्यालाच पोलिस कर्मचारयाला गजाआड करावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र दिसत आहे. एका पोलिस कर्मचारयामुळे संपूर्ण पोलिसखाते बदनाम झाले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून यवत पोलिसांकडे तपास देण्यात आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दया गावडे यांनी दिली.