Breaking News

माजी खा. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास : खरात


भारिप या पक्षाची ध्येयधोरणे व पक्षवाढीसाठी सर्वांनी काम करावे. माजी खा. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून एकजूट दाखवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी केले.

श्रीरामपूरला ‘भारिप’ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित गायकवाड, तालुका अध्यक्ष महिला आघाडी श्रीरामपूर -निशा यशवंत भोसले, तालुका उपाध्यक्ष कविता झिने, शहराध्यक्ष चंद्रकांत वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष खरात यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले. बैठक पार पडली. याबैठकीदरम्यान नूतन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन होत आहे.