Breaking News

गायकवाड यांची ‘प्रवरे’ला कुटुंब मानून सेवा : विखे

आश्वी : प्रतिनिधी - पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेले प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे रोपटे पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे यांनी वाढत असताना जातीपातीच्या राजकारणाला कोठेही थारा दिला नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदार संघात ३२ वर्षे संस्थेला आपले कुटुंब मानून प्रामाणिक सेवा करत विद्यार्थी घडवण्याचे काम मुख्याध्यापक मधुकर गायकवाड यांनी केले, असे प्रशंसोदगार जि. प. अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी काढ.

संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे मुख्याध्यापक मधुकर विठ्ठलराव गायकवाड यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रामभाऊ भुसाळ होते. यावेळी विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जि. प. सदस्या अँड. रोहिनी निघुते, शैलजा नावदंर, मुख्याध्यापक मधुकर गायकवाड, विजया गायकवाड, संचालक भागवंत उंबरकर, उद्योजक विलास उंबरकर, माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर, संचालक हरिभाऊ आहेर, सचिव भारत घोगरे, सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, शिक्षणाधिकारी एस. आर. रेठरेकर, केंद्रप्रमुख वाघ, अण्णासाहेब सारबंदे, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, विजय शेळके, मुख्याध्यपक गिरी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक मधुकर गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रकाश बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष उंबरकर यांनी आभार मानले.