Breaking News

रामलिंग येथून फारुक सय्यद बेपत्ता

सात्रळ : येथील रामलिंग येथून फारुक (वय३५) हे बेपत्ता झाले आहेत. त्यांची तक्रार त्यांच्या पत्नी रेश्मा सय्यद यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिली आहे. फारुक सय्यद हे न्हावरे फाटा येथे चार चाकी गाड्याना पेन्टिंग करण्याचे काम करत. मात्र सोमवारपासून ते घरी परतले नाही. मात्र त्यांची दुचाकी मोटार दुकानासमोर आढळली. माहिती मिळाल्यास शिरूर पोलिस ठाण्याच्या (०२१३८/२२२१३९) या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस हवालदार बाळासाहेब खोमणे यांनी केले.