प्रवीण तोगडियांना झटका, व्ही. एस. कोकजे विश्व हिंदू परिषदेचे नवे अध्यक्ष
नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व्ही. एस. कोकजे यांची निवड झाली आहे. त्यामुळे प्रवीण तोगडियांना मोठा झटका बसला आहे. विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी ५० वर्षात आज पहिल्यांदाच मतदान झाले.
अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत कोकजे यांनी १३१ मते मिळवत राघव रेड्डी यांना हरवले. रेड्डी यांना मात्र ६० मते मिळाली. विहिंपचे एकूण १९२ पदाधिकारी गुरुग्राम येथे झालेल्या मतदानासाठी पात्र होते.
परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवर एकमत न झाल्याने अखेर निवडणुकीचा पर्याय वापरण्यात आला.