मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. तसेच महाडच्या चवदार तळ्यावर देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. गरीबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला.
दादरमधील इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्मारक उभारण्यात येणार असून इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाची दृश्य स्वरुपात इमारत २०१९पर्यंत उभी राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.