अशोक डिलक्स हॉटेलमध्ये चालणारे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पुणे : पुण्यातील प्रसिध्द जंगली महाराज रस्त्यावरील अशोक डिलक्स हॉटेलमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले. यावेळी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले तर राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथील दोन तरुणांची सुटका केली. विशाल देशमुख (गोकूळनगर, कात्रज), एजंट सजंट विशाल (रा. जयपूर राजस्थान), ला ॅज मॅनेजर विनोद वरक (रा.चिपळून, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नितीन तराटे यांना सदरील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी बाहेरगावाहून वेश्याव्यवसायासाठी मुलींना आणून शहरातील लॉजमध्ये ठेवत असत. त्यानंतर गि-हाईकांना त्यांचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवून सौदा ठरवत आणि गि-हाईकाला त्या-त्या लॉजवर पाठवत होते. ताब्यात घेतलेल्या मुलींना सुरक्षिततेसाठी महंमदवाडी हडपसर येथील रेस्क्यू फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.