Breaking News

गून्हा दाखल करण्यासाठी कर्मचार्‍यांची पोलिसांत तक्रार

चर्चेची माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारले असता, माझ्याकडे अशी अजून तरी तक्रार आलेली नाही. तुम्ही म्हणताय तर कदाचित मला असं वाटतयं हा विरोधकांचा डाव असेल असे म्हणत विषयांतर करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पदाधिकार्‍यानेही याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. दरम्यान मुख्याधिकारी औंधकर यांनी केलेला खुलासा अन् त्यात त्यांची उडालेली भंबेरी पाहता काहीतरी गडबड निश्‍चित आहे. कर्मचार्‍यांच्या खात्यातून एकाच वेळी पैसे कोणी काढले? हे त्या बँकेच्या अधिकार्‍यांना विचारले असता नगरपरिषदेचे काही कर्मचारी एकाच वेळी विड्रॉल स्लिपचा गठ्ठा घेऊन बँकेत आले होते असे सांगितले मात्र पुढील माहिती आधिकार्‍यानी दिली नाही. कर्मचार्‍यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणार्‍यांवर चौकशी करून गून्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिला आहे. जामखेड नगर परिषदेच्या स्थापनेपासुन सतत वादांचे मोहळ उठत आले आहे. या वादांच्या मोहळात जामखेडकरांची होणारी फरफट थांबवण्यासाठी कोण पुढे येणार ? हा खरा प्रश्‍न आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आता स्वच्छता मोहिम राबविली पाहीजे, अन्यथा जनतेत सरकारविरोधी जो सूर आहे त्यात मोठी भर पडेल हे मात्र निश्‍चित.