Breaking News

‘एम्स’चे निवासी डॉक्टर अनिश्‍चित काळासाठी संपावर


नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या (एआयआयएमएस) निवासी डॉक्टर संघाने (आरडीए) अनिश्‍चित काळासाठी संप पुकारला आहे. या डॉक्टरांनी, निवासी डॉक्टरची छेड काढणार्‍या एका कर्मचार्‍याची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. हा संप गुरुवारी पुकारण्यात आला. डॉ. अतुल कुमार या वरिष्ठ डॉक्टरने कनिष्ठ डॉक्टरचा शारीरिक छळ केला असून त्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवासी डॉक्टर संघाने केली आहे. आम्ही केवळ अति आवश्यक सेवा आणि अतिदक्षता विभागातच काम करून संबंधित डॉक्टरांना त्याच्या पदाहून निलंबित करत नाही, तोवर संप सुरूच राहील, असे निवासी डॉक्टर संघाने म्हटले आहे.