Breaking News

भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

सातारा : पुणे पंढरपूर मार्गावर बरड येथे झालेल्या भीषण अपघातात 3 अल्पवयीन मुलांसह पाचजण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर चारजण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. 

सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या कारला (एमएच 14 बीसी- 9480) हा अपघात झाला. बरड गावच्या हद्दीत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचं इंजिन ड्रायव्हर सीटपर्यंत आलं. या गाडीत एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यापैकी पाच प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला, तर चारजणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींवर फलटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचजणांची बसण्याची क्षमता असलेल्या या गाडीतून सुमारे नऊजण प्रवास करत होते. या अपघाताचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करत आहेत. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने चाललेली असेंट कार क्र. एमएच 14 बीसी-9480 ही शुक्रवारी दुपारी बरड गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर चालकाचा अचानक गाडीवरून ताबा सुटला, यामुळे ती कार रस्त्यालगत असणा-या झाडाला जाउन धडकली. या गाडीमध्ये 9 जण प्रवास करीत होते. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते.