Breaking News

कर्ज घेऊन पसार झालेल्यांना शोधणार गुप्तहेर


कर्ज घेऊन पसार झालेल्या थकबाकीदाराचा शोध घेण्यासाठी गुप्तहेराची नियुक्ती करण्याचा निर्णय पंजाब नॅशनल बँकेने घेतला आहे. यासाठी गुप्तहेर संस्थांनी पाच मेपर्यंत अर्ज करण्याचे निर्देश बँकेने दिले अाहे. या गुप्तहेर संस्थांना कर्ज घेणाऱ्यांव्यतिरिक्त त्यासाठीचे हमीदार आणि उत्तराधिकारी यांचाही शोध घ्यावा लागणार आहे. त्यांना थकबाकीदाराचा नवा पत्ता, बिझनेस, उत्पन्नाचा स्रोत आणि संपत्तीची पूर्ण माहिती जमा करावी लागेल. वास्तविक कर्ज घेणारे अनेक कर्जदार बँकेला देण्यात आलेल्या पत्त्यावर राहत नाहीत. त्यांचा नवीन पत्ता शोधण्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी होत आहेत.