Breaking News

इम्रान खान यांची तिसरी पत्नीही गेली घर साेडून


वृत्तसंस्था | इस्लामाबाद/लाहाेर क्रिकेटमधून राजकारणात उतरलेले व तेहरीक-ए-इन्सान पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांचे तिसरे लग्नही धाेक्यात अाले अाहे. तिसऱ्या पत्नीनेही त्यांचे घर साेडल्याची पाकिस्तानात चर्चा अाहे. इम्रान खान यांच्या घरातील पाळीव कुत्र्यांमुळे तिने हे पाऊल उचलल्याचे कारण सांगितले जात अाहे. मात्र, पाकचे उर्दू दैनिक 'उम्मत'नुसार तिसरी पत्नी बुशरा मेनकाचा पहिल्या लग्नाचा मुलगा इस्लामाबाद येथील इम्रान खान यांच्या घरी अधिक काळ वास्तव्यास राहिल्यावरून या दांपत्यात वाद झाला. त्याच्या वास्तव्याला खान यांनी हरकत घेतल्याने बुशरा खान यांचे घर साेडून माहेरी निघून गेल्याचे सांगितले जात अाहे. दरम्यान, इम्रान खान यांनी अापली अाध्यात्मिक गुरू बुशराशी यावर्षीच फेब्रुवारीत विवाह केला हाेता.