Breaking News

पारदर्शकतेला सुरूंग लावणारा शहर इलाखाच्या अपहाराने मुख्यमंत्री कार्यालयाला हादरे

मंत्रालय काँक्रिटीकरणाचे प्रकरण गुंतागुंतीतून संवेदनशील बनले आहे. शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके या दोन कार्यकारी अ भियंत्यांच्या कार्यकाळात मंत्रालय परिसरात झालेल्या कामातील परस्पर पुरक अपहाराचा मुद्दा जाणकारांची मती गुंग करण्यास कारणीभूत ठरला आहे. एकाने काँक्रिटीकरणावर पुन्हा काँक्रीटीकरण केल्याचा बनाव करून लाखो रूपयांची तर दुसर्‍याने काही महिन्यांपुर्वी झालेल्या काँक्रिटीकरणाचे डेब्रीज काढण्याच्या नावावर पुन्हा कोटीचा झोल करायचा असा हा खेळ सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीमुळे उघड झाला आहे.


राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाची इमारत आणि परिसरात शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांच्या कार्यक ाळात झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची चर्चा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहचली आहे, या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी समजुतदारपणे केलेला हा अपहार गुंतागुंतीचा, गंभीर असल्याने राज्यात पारदर्शक कारभाराचे धडे देणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे कार्यालय आचंबित झाले आहे. दिव्याखाली अंधार काय असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून या घटना भविष्यात विरोधक जनतेसमोर ठेवू शकतात या विवंचनेमुळे मुख्यमंत्र्यांना या अपहाराकडे जाणीवपुर्वक पहायला लागेल, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या गोटातील एका आमदारांनी दि. 6 फेब्रुवारी 2018 रोजी या दोन्ही प्रकरणांची तक्रार मुख्यमंत्र्यांना केली आहे.
पहिल्या तक्रारीत रणजीत हांडे यांच्या कर्तृत्वाची कुंडली मांडतांना दोन वर्षापुर्वी मंत्रालयात झालेल्या काँक्रिटीकरणावर नव्याने काँक्रिटीकरण करण्याचे काम प्रस्तावित केले.चोवीस लाखाच्या कामांचे आठ बेकायदेशीर तुकडे पाडून तीन कंत्राटदार कंपन्यांना दिले. त्याची देयके अदा केली.तर त्यांच्यानंतर शहर इलाखा साबांचा कार्यभार घेणार्‍या कार्यकारी अ भियंता प्रज्ञा वाळके यांनी हांडे यांनी कागदावर केलेल्या काँक्रिटीकरणाला उध्वस्त करण्याचा पराक्रम कागदावर दाखवून शेकडो ट्रक्स डेब्रीज मंत्रालयाच्या बाहेर काढले. या दोन्ही प्रकरणात हांडे आणि वाळके हे दोन्ही कार्यकारी अभियंता साक्षी आहेत. या दोघांचे काम परस्परांच्या अपहाराला पुरक असल्याचे पुरावे आहेत. (क्रमशः)
उद्याच्या अंकातः
हांडे वाळकेंचा परस्पर पुरक अपहार
मंत्रालय काँक्रिटीकरणाचे कार्यारंभ आदेश आणि देयके अदा करण्याची भ्रष्ट शैली
मंत्रालय डेब्रिज प्रकरणामागची वस्तुस्थिती, कार्यारंभ आदेश आणि देयकामागचा अपहार