Breaking News

घाडगे पाटील विद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाण संचलीत श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतीक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. चे विस्तार अधिकारी आर पी पठाण होते. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरक्षनाथ वराळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील आंबेडकरी विचाराने भारावलेल्या पवनकुमार वाहुटूळे , प्राजक्ता कुटे, विशाखा धुमाळ, ओहळ या विद्यार्थांनी भाषणे केली. याप्रसंगी प्रा.लोंढे, प्रा.अवताडे , पैठणे , श्रीमती साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांच्या जीवनातून विद्यार्थांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पर्यवेक्षक संजयसिंह चौहाण, तांबे, उमाजी जंगले, संतोष निंबाळकर,पब्लीक स्कूलचे उपप्राचार्य अरविंद देशमुख यांच्या सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कापसे, महादेव काकडे, पैठणे, खाटीक, श्रीम. सुरेखा वैरागर, मगर आदिनीं परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक गाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन तांबे यांनी केले. शेवटी संविधनाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.