Breaking News

पारनेर खरेदी विक्री संघात शासकिय हराभरा केंद्राचे उदघाटन


पारनेर येथील खरेदी विक्री संघात आज शासकिय हरभरा विक्री केंद्राचे उद्घाटन डॉ. सुजय विखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.पारनेर तालुका खरेदी विक्री संघात शासकिय हरभरा केंद्राचे उद्घाटन काल रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी हे होते. नाफेड अंतर्गत पारनेर तालुका खरेदी विक्री संघाला नुकतीच परवानगी मिळालेली आहे. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सांगीतले. 

यावेळी पारनेर तालुका दुध संघाच्या चेअरमनपदी राहुल शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉ. सुजय विखे यांचेहस्ते सत्कार करण्यात आला. तर प्रास्ताविक संघाचे चेअरमन संभाजी रोहकले यांनी केले. 
याप्रसंगी डॉ. भास्कर शिरोळे, रघुनाथ खिलारी, राहुल झावरे, गंगाराम बेलकर, मधुकर पठारे, रामभाऊ मांडगे, आनंद रणसिंग, सचिन वराळ, मारुती रेपाळे, राजाराम एरंडे, दादा वारे, सर्व संचालक व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकर्‍यांनी माल घेऊन येताना स्वतःचे बँक पासबुक, आधारकार्ड, 7/12 उतारा घेऊन येण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व संचालक यांनी केले आहे.