Breaking News

मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

निंगावजाळी येथिल श्री बालाजी ग्रामिण सांस्कृतीक कला व क्रिडा प्रतिष्ठानणच्या वतीने सहकार चळवळीचे प्रणेते स्व. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दि २७ एप्रिल २०१८ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थचे सचिव गंगाराम धनवटे यांनी दिली.

श्री बालाजी ग्रामिण सांस्कृतीक कला व क्रिडा प्रतिष्ठाणच्या वतीने वर्षभर कला व क्रिडा क्षेत्रातील विविध स्पर्धांसह ,शैक्षणिक,आयरोग्य विषयक आणि सामाजिक असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. या संस्थच्या वतीने मुलं-मुलींसाठी नुकतेच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा या साठी अनेकविध कार्यक्रम शिबीर काळात आयोजित करण्यात आले आहेत.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिष्ठानणच्या वतीने निंगावजाळी येथील बालाजी मंदिरा शेजारील बालाजी प्रतिथ्यांच्या सभागृहामध्ये या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे. प.स. सदस्या सौ. दिपालीताई डेंगळे, सौ. सुजाताताई थेटे, मछिंद्र थेटे ,बाळासाहेब डेंगळे यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .तरी गरजू व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण पवार,जनार्धन पवार आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.