Breaking News

के. एम. जोसेफ यांची नेमणूक का नाही ? : पी. चिदंबरम

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने 2 वकिलांची शिफारस केली असताना केवळ इंदू मल्होत्रा यांची न्यायाधीशपदी नेमणूक केल्याबद्दल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रावर टीका केली. कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमची शिफारस अंतिम आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी बंधनकारक असते. कायद्यापेक्षा मोदी सरकार मोठे आहे का?, असा सवाल चिदंबरम यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला. केंद्र सरकारने वरिष्ठ वकिल इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्याायाधीश म्हणून नेमणूक केली आणि उत्तराखंडचे न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत चिदंबरम यांनी प्रश्‍न उपस्थित केले असून के. एम. जोसेफ यांच्या धर्मामुळे त्यांना डावलला गेले का असेही चिदंबरम यांनी म्हटले.