Breaking News

बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन


बालाजी देडगाव ( प्रतिनिधी ) - नेवासा तालुक्यातील मुंगसे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती शाळेत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले. शाळेच्या अगदी जवळून मुळा उजवा कालवा वाहत असल्याने शाळेस संरक्षण भिंतीची नितांत आवश्यकता होती. मुंगसे वस्ती शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत देडगाव ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्याचा ठराव घेतला व अल्पावधीतच या कामास मंजुरी मिळाली . तसेच शाळेत चित्रित होत असलेल्या व शिक्षक व विद्यार्थी अभिनय करीत असलेल्या ’ जलसाक्षरता ’ या भाऊसाहेब चंदन यांच्या लघुपटाच्या चित्रीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच लक्ष्मण गोयकर, माजी उपसरपंच दत्ता मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मुंगसे, अभिजित ससाणे, उद्धव मुंगसे, केंद्रमुख्याध्यापक शहाजी ढोले , ग्रामसेवक शेलार भाऊसाहेब , काॅन्ट्रॅक्टर अरुण देशमुख , राजेंद्र मुंगसे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरूण मुंगसे, सुभाष मुंगसे, राजेंद्र मुंगसे, गोकुळ मुंगसे, शांताराम बावधनकर, कानिफ मुंगसे, देविदास मुंगसे, गिताराम मुंगसे, सोमनाथ मुंगसे, अशोकराव सोनवणे, दिपक मुंगसे, संजू कुटे, बंडू मुंगसे, तारा कुटे, आश्‍विनी मुंगसे, समाबाई मुंगसे, आदी उपस्थित होते. यावेळी रविराज चौरे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी भाऊसाहेब चंदन यांनी उपस्थितांचे आभार मानले