Breaking News

हरभरा खरेदी केंद्राचे थाटात उदघाटन


कोपरगांव: शासन, नाफेड, कोपरगांव बाजार समिती आणि शेतकरी सहकारी संघ यांच्या संयुक्त सहकार्याने कोपरगांव येथे शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. तहसिलदार किशोर कदम यांच्या हस्ते काल {दि. १७} या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. आ. स्नेहलता कोल्हे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती मधुकर टेके, उपसभापती नानासाहेब गव्हाणे, सहायक निबंधक आर. एल. त्रिभुवन, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक शिवाजीराव वक्ते, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बोरावके, संभाजी रक्ताटे, ज्ञानेश्वर परजणे, सुभाष आव्हाड, भास्करराव भिंगारे, प्रदिप नवले, माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर, निलेश देवकर, सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, विजय रोहोम, चांगदेवराव आसने, रमेश औताडे, बापूराव बारहाते, रघुनाथफटांगरे, साहेबराव रोहोम आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, बाजार समिती आणि शेतकरी सहकारी संघाचे संचालक आदी उपस्थित होते. 

प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड व उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून सत्कार केला. व्यवस्थापक हरिभाउ गोरे व ग्रेडर भोरकडे यांनी हरभरा खरेदी योजनेबाबत माहिती दिली.