Breaking News

भैरवनाथ विद्यालयात आजी माजी सैनिक मेळावा

पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालयात माजी विद्यार्थी असणारे आजी-माजी सैनिक यांचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. ज्या शाळेने आम्हास मोठे केले, ज्यामुळे देश सेवेत सहभागी होता आले. त्या शाळेच्या ऋणात रहावेसे वाटते अशी प्रतिक्रिया पळवे खुर्द येथील आजी-माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष आंबादास तरटे यांनी आपल्या भाषणात भावना व्यक्त केल्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सैनिक भिमाजी शेळके होते. कृषिजन विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष सदाशिव शेळके यांनी सैनिकांचे देशासाठी योगदान व त्यांची महत्वपूर्ण भूमिका याविषयी मार्गदर्शन व कार्य विषद केले. यावेळी सैनिक संस्थेचे अध्यक्ष आंबादास तरटे, उपाध्यक्ष संजय शेलार, कोषाध्यक्ष सोपान पवार, मेजर शांताराम तरटे, नामदेव तरटे, बाबासाहेब शेळके, ढुस मेजर, पळसकर मेजर, आप्पा तरटे, नवनाथ गाडीलकर, राजु गाडीलकर, गुंड रोहीदास आदी आजी व माजी सैनिक या मेळाव्यास उपस्थित होते. शाळेच्या इमारतीसाठी रोख रक्कम मदत करुन ज्या शाळेमुळे आम्हाला देश सेवक होता आले, त्या शाळेसाठी आम्ही निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी सैनिकांनी सांगितले. शाळेच्या ऋणात राहणे आम्हाला आवडेल, अशीही भावणा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र गोरे यांनी तर सुत्रसंचालन तबाजी मधे व पोपट जाधव यांनी केले. आभार उषा औटी यांनी मानले.