कर्जत प्रतिनिधी शहरातील यासीननगर येथील येथील अामिन अब्दुल रहेमान शेख यांच्या राहत्या घरातून अइाात चोरटयाने ८२ हजार रूपयांची चोरी करून पोबारा केला. शेख हे कुटूबांसह घरात झोपले असता पहाटे ३ च्यादरम्यान हा प्रकार घडला. अनोळखी चोरटयाने शेख यांच्या घरात प्रवेश करून घरातील ६० हजार रुपये रोख, १० हजार रुपये किंमतीचे ११ ग्रॅम वजनाचे गंठण, ६ ग्रॅमची ३ हजार रुपयांची १ अंगठी, ९ हजार रुपयांचे १० ग्रॅम वजनाचे दोन डोरले असा एकूण ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शेख यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक वसंतराव भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हे. का. शेलार हे पुढील तपास करत आहेत.