विकासकामांतून साकूर विकासाचे मॉडेल : आ. थोरात
तालुक्यातील साकूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमीपूजनप्रसंगी कार्यजक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, जि. प. सदस्य भाऊसाहेब कुटे, आर. एम. कातोरे, मिलिंद कानवडे, पं. स. सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, उपसभापती सतीष कानवडे, युवा नेते इंद्रजित खेमनर, बाबा ओहोळ, पं. स. सदस्या संगिता कुदनर, सुभाष आहेर, बाजार समितीचे सचिव सतिष गुंजाळ, साकूर गावच्या सरपंच नंदा खेमनर, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार गावचा कायापालट केला आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श सरपंच म्हणून पवार यांचे नाव आदराने घेतले जात आहे. तशाच पद्धतीने आता शंकरराव खेमनर व स्व. अशोकराव खेमनर यांनी साकूर गावचा कायापालट केला आहे. त्यामुळे पवारनंतर महाराष्ट्रात शंकरराव खेमनर यांचेही आदर्श सरपंच म्हणून नाव घेतले जावू लागले आहे. आता त्यांनी साकूर पुरते मर्यादित न राहता गावोगावच्या सरपंचांना मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. यावेळी आ, डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, युवा नेते इंद्रजित खेमनर आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. अशोक हजारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते