Breaking News

कृषी जैवतंत्र महाविद्यालयामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याला अभिवादन

सहकारी साखर कारखानदारीचे जनक स्व. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त कृषी जैवतंत्र महाविद्यालयामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याला अभिवादन करून स्मृतींना उजाळा देण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी नामांकित कवी व साहित्तिक डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी आपल्या कवितेतून विठ्ठलराव विखे पाटील यांच्या थोर कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी कृषी जैवतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, प्रा. वरखड, प्रा. सत्यन खर्डे, प्रा. राहुल विखे, प्रा. आशिष क्षीरसागर, प्रा. सारिका पुलाटे, श्री. किशोर गुळवे, श्री. दतात्रय कांबळे, श्री. शिवाजी डमरे, श्री. अरुण विखे, सौ. सुजाता गुंजाळ, श्री. सचिन ब्राम्हणे, श्री. विजय मगर, श्री. भाऊसाहेब पोकळे, श्री. सलीम शेख व श्री. गुंजाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.