Breaking News

‘राष्ट्रीय कायाकल्प’च्या विजेत्यांचा गौरव


श्रीरामपूर ता. प्रतिनिधी - राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्रत्येक राज्यात प्रथम आलेल्या रुग्णालयाचा पुरस्कार देऊन केंद्रशासनातर्फे दिल्ली येथे गौरविण्यात आले.राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जिल्ह्यामधील ‘श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय’ यांच्यावतीने रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. वसंतराव जमधडे, जिल्हा गुणवत्ता आश्वासक सल्लागार डाॅ. राहूल शिंदे, प्रसन्न धुमाळ, विजया जमधडे यांनी भारत सरकारचे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा तसेच भारत सरकारच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते स्विकारला. या कार्यक्रमास केंद्रस्तरीय प्रशासकीय व आरोग्य सेवेतील सर्व अधिकारी उपस्थितीत होते. या कार्यक्रमात भारतातील सर्व राज्यामधील प्रथम आलेल्या आरोग्य संस्थांचादेखील गौरव करण्यात आला.