ज्वारी सुधार प्रकल्प वार्षिक आढावा
राहुरी विद्यापीठ : येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे तृणधान्य संशोधन संस्था, राजेंद्रनगर {हैद्राबाद} यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ पासून अखिल भारतीय ज्वारी सुधार प्रकल्पाच्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वार्षिक आढावा बैठक कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या बैठकीच्या समारोपप्रसंगी डॉ. त्रिलोचन मोहापात्रा, सचिव, कृषि संशोधन आणि शिक्षण विभाग, भारत सरकार आणि महासंचालक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि कृषि) डॉ. ए.के. सिंग, सहाय्यक महासंचालक (चारा पीके) डॉ.
ए.एस. सोळंकी, प्रकल्प समन्वयक डॉ. प्रभाकर, डॉ. सी. तारा सत्यवती उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे ज्वारी संशोधनाच्या कक्षा रुंदावल्या जातील, अशी माहिती संचालक संशोधन डॉ. शरद गडाख आणि वरीष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. अशोक जाधव यांनी दिली.