कुरीअर सेवेचा थाटात शुभारंभ
नेवासा शहर प्रतिनिधी - येथे डी टी डी सी एक्स्प्रेस लिमिटेड या कुरीअर सेवेचा शुभारंभ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे, नंदकुमार पाटील, अँड. बापूसाहेब गायके, महेश मापारी, अल्ताफ पठाण, सतीश गायके, गणेश कोरेकर, शिवभक्त विष्णू नाबदे, भगवानराव नाबदे, लक्ष्मण नाबदे, गणेश नाबदे, सुनील जाधव, माणिक आदमने, जयकुमार गुगळे, सुहास पठाडे, पवन गरुड, अमोल रनमले, नवनाथ जाधव, राजेंद्र लोखंडे, अनिल निकम, कृष्णा परदेशी, प्रथमेश बहादुरे, आदी यावेळी उपस्थित होते. पत्रकार शंकर नाबदे यांनी स्वागत करून प्रास्तविक केले. शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा देणाऱ्या डी टी डी सी या सेवेची त्यांनी माहिती दिली. या आंतरराष्ट्रीय कुरीअर सेवेमुळे ग्राहकांची चांगली सोय झाली असल्याचे सांगून या सेवेला उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.